बेंगळूर/प्रतिनिधी
कोवॅक्सिनचे २० हजार डोस लवकरच राज्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ.के.सुधाकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोवॅक्सिन कुपी आणि कोविशील्ड कुपीमध्ये फरक आहे. कोविशील्ड कुपीमध्ये ५ मिली आणि कोवॅक्सिन कुपीमध्ये १० मिली लस असते. एक कुपी २० लोकांना लसी देऊ शकते. दोन्ही लस राज्यात दिली जाईल असे मंत्री म्हणाले.
कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या कर्मचार्यांना लस दिली जावी या संदर्भात केंद्र सरकारने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. १६ जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन होऊन सर्व जिल्ह्यांना लसीचे वितरण केले जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी मंत्री सुधाकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात नव्याने सामील झालेल्या मंत्र्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी काही नेते यादीमध्ये येऊ शकले नाहीत, परंतु त्यांना पक्षात योग्य स्थान देण्यात येईल. आमचे सरकार पारदर्शकपणे काम करीत असून सर्व योजना लाभार्थींच्या दारात नेऊन ठेवली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हा लोकशाहीचा एक भाग आहे, असे डॉ. सुधाकर म्हणाले. सर्व नेते एकजूट आहेत आणि त्यांच्यात कोणताही मतभेद नाही, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.