बेंगळूर/प्रतिनिधी
ड्रग रॅकेट प्रकरणात अटक झालेल्या कन्नड चित्रपट अभिनेत्री संजना गलराणी हिला जेंव्हा डोप टेस्टसाठी केसी जनरल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता ती संतापली. तिने मला बळीचा बकरा बनवला जात असून मी कसलीही टेस्ट देणार नसल्याचे संजनाने म्हंटले आहे.
कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) अधिकाऱ्यांनी संजना आणि रागिनी दोघांनाही डोप टेस्टसाठी केसी जनरल हॉस्पिटलमध्ये नेले. जेव्हा तिला डोप टेस्टसाठी विचारणा केली गेली तेव्हा ती भडकली. संजनाने तिच्या मूलभूत अधिकारांची बाजू मांडायला सुरुवात केली आणि सीसीबीचे पोलीस निरीक्षक पुनीत कुमार यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.