बेंगळूर/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एच. डी. कुमारस्वामी यांना ६१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री श्रीएचडी_कुमारस्वामी जी यांच्या वाढदिवशी त्यांना उत्तम आरोग्य देवो, तसेच त्यांना देव दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद देवो, असे मोदींनी ट्विट केले आहे. कुमारस्वामी हे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे पुत्र आहेत.