बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जद-एस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी पक्षाचे कार्यकर्ते ही पक्षाची खरी ताकद आहे. जर या कार्यकर्त्यांनी पक्षाला सत्तेत आणण्याचा संकल्प केला तर आगामी काळात पक्ष स्पष्ट बहुमताने सरकार बनवू शकेल, असे ते म्हणाले.
दरम्यान कुमारस्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या कार्यालयात जयप्रकाश नारायण भवन येथे आयोजित विचारसरणी चर्चासत्रात ते बोलत होते.कुमारस्वामी यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण १५ जानेवारीनंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याचे सांगितले.
पक्ष संघटनेच्या दुर्लक्षामुळे पक्षाला निवडणुकीत अपेक्षित यश मिळत नाही. राज्यातील सर्व जिल्ह्यांत बूथ स्तरावर पक्षाची रचना मजबूत करावी लागेल. या कार्यक्रमात कुमारस्वामी यांनी राज्यातील विविध जिल्हा घटकांच्या अध्यक्ष व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.