बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकेचे पर्यटनमंत्री सी. टी. रवी हे कोरोनमुक्त झाले आहेत. मंत्री रवी यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे. मंत्री रवी यांनी ट्विटद्वारे आपल्या आरोग्याविषयी माहिती दिली. तसेच त्यांनी आपण सोमवार पासून काम सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.
मंत्री रवी यांनी आपण लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. मंत्री रवी यांना दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मंत्री रवी यांनी क्वारंटाईन काळात बहुतेक वेळ पुस्तके वाचणे, योगाभ्यास करणे, चालणे यात घालविला. परंतु यावेळी त्यांनी राज्याच्या वृत्तावरही लक्ष ठेऊन होतो असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी कर्नाटकमधील दररोजच्या कोरोना परिस्थिती विषयी माहिती दिली. त्यांनी गुरुवारी चोवीस तासात ५०३० नवीन रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले. तसेच गुरुवारी बेंगळूरमध्ये कोरोनाचे २२०७ नवीन रुग्ण आढळले आहेत. असेही ते म्हणाले.