बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील सिरा आणि बेंगळूर विधानसभा मतदारसंघातील राजराजेश्वरी नगरच्या पोटनिवडणुकीत भाजप विजयी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आर. आर. नगरमध्ये, भाजपचे उमेदवार मुनिरत्न मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर सिरामध्ये पक्षाची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
आर. आर. नगरमध्ये भाजपचे मुनिरत्न ५७,९३६ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना १,२५,७३४ मते मिळाली तर कॉंग्रेसच्या उमेदवार कुसुमा यांना ६७,७९८ मते मिळाली. जद-एसचे उमेदवार कृष्णमूर्ती यांना १०,२५१ मते मिळाली आहेत.