बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कर्नाटक सरकारने गुरुवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात इयत्ता सहावी ते नववी पर्यंतचे नियमित वर्ग बंद करण्याची घोषणा केली.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिलेल्या निवेदनात, “कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता इयत्ता सहावी ते नववी पर्यंतचे शारीरिक वर्ग तातडीने बंद करण्यात आले आहेत,” असे म्हंटले आहे. राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
तथापि, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्ग सुरू राहतील. राज्यातील इतर भागांमध्ये इयत्ता सहावी ते नववी पर्यंतचे नियमित शारीरिक वर्ग चालूच राहतील कारण भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येतील अशी अट आहे. परीक्षेसंदर्भात मंत्र्यांनी स्पष्ट केले की सहावी ते नववी या वर्गांच्या परीक्षा घेण्याचे निर्देश येत्या काही दिवसांत घेण्यात येतील.