कलबुर्गी/प्रतिनिधी
कर्नाटकात राजकीय नेत्यांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यात आणखीन एका राजकीय नेत्याची भर पडली आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील जेवर्गी विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार अजय सिंह यांचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे.
अजय सिंह यांनी एक ट्विट करून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. अजय सिंह हे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एन. धरम सिंह यांचे पुत्र आहेत.
याआधी मंगलोरचे आमदार भारत शेट्टी, आमदार डॉ. रंगनाथ, विधान परिषद सदस्य प्रणेश, मांड्या मतदार संघाच्या खासदार सुमलथा यासह अन्य राजकीय नेते पॉझिटीव्ह आढळले आहेत.