क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
भारतीय मूक-बधिर क्रिकेट संघटना यांच्या मान्यतेनुसार आग्रा-उत्तर प्रदेश येथे होणाऱया सहाव्या टी-20 राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची निवड करण्यात आली. या संघात बेळगावच्या आनंद क्रिकेट अकादमीचा खेळाडू नागराज निर्वाणी याची संभाव्य 13 खेळाडूंच्या यादीत निवड झाली आहे.
होसकट्टीत झालेल्या शिबिरानंतर कर्नाटक संघाची निवड करण्यात आली. पृथ्वीराज शेट्टी-कर्णधार, गुरू के.-उपकर्णधार, शर्मित राव, सतीश, भिमराय, शोहेब मोहम्मद, माधवा, श्रेयश भट्ट, डॉम्निक, कृष्णनाथा जे, नागराज निर्वाणी, मानु एन., अनिलकुमार जी., आर. अरुण प्रकाश, अभिषेक एम. एस. या खेळाडूंची संघात निवड झाली
आहे.
तर लोहीत जी., हर्षित एन., बाला राजू, साईनाथ शेट्टी, बालमुरघा ए. आदी खेळाडूंची राखीव यादीत निवड झाली आहे. हा संघ 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.