बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना पत्र लिहून त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ६ ऑगस्ट रोजीच्या पत्रात राज्यपालांनी म्हंटले आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्र्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे राज्यपालांनी माजी मुख्यमंत्र्यांना लवकर बरे होण्यासाठी पात्राच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
याचबरोबर सीएम बी. एस. येडियुरप्पा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर एका दिवसानंतर सिद्धरामय्या यांना बेंगळूरच्या मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.