बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात दिवसेंदिवस कोविडची प्रकरणे वाढतच आहेत. कर्नाटकमध्ये कोरोनाने सर्व विक्रम मोडले आहेत, गेल्या २४ तासात राज्यात १४,८५९ जणांना संसर्ग झाला आहे. दरम्यान राज्यात गुरुवारी १४,७३८नवीन प्रकरणे नोंदली गेली होती. आतापर्यंत एकाच दिवसात संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त संख्या आहे. राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ११,२४,५०९ वर पोहोचली आहे. यापैकी १०,०३,९८५ रूग्ण यशस्वी उपचारानंतर घरी परतले आहेत. दरम्यान शुक्रवारी रुग्णालयातून ४,०३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात शुक्रवारी ७८ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात सध्या सक्रिय रूग्णांची संख्या १,०७,३१५ वर पोहोचली आहे. यापैकी ५७७ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. कोविडमुळे राज्यात एकूण १३,१९० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात बेंगळूर शरि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. जिळ;ह्यात बाधितांचा वेग वाढत आहे. दरम्यान जिल्ह्यात शुक्रवारी ९९१७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडलीआहे.जिल्ह्यात सध्या ७९,६१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुळे शुक्रवारी ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५,०२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.