बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. गुरुवारी राज्यात ४०८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात ५६४ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. तर ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात सध्या ८,७२८ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत १२,१५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९,२९,९६० वर पोहोचली आहे. तर यापैकी ९,०९,०५८ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.
राज्यात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात १४१ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर २५५ रुग्णांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. जिल्ह्यात सध्या उपचारात असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ५,५६१ इतकी आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ४,३५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.