बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी शनिवारी दहावीच्या परीक्षेस बसण्यास बंदी घातलेल्या विद्यार्थिनींची भेट घेतली. तिची शाळेची फी न भरल्यामुळे तिच्या शाळेने बोर्डाच्या परीक्षेस बसू देणार नसल्याचे म्हंटले होते. पण शिक्षणमंत्र्यांनी भेटीनंतर तिला मदत करण्याचे आश्वासन दिले.
कोरातगेरे, हनुमंतपूर येथील मुलगी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका खासगी शाळेत शिकत होती, परंतु कोरोना लॉकडाऊनमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावल्याने ती फी भरण्यास असमर्थ असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. तसेच सुरेश कुमार यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये मुलीने वसतिगृह फी भरली नसल्याने तिला शाळेत प्रवेश नाकारला असल्याचे सांगितले. “गेल्या वर्षीच्या शाळेच्या फी (राहण्याची व्यवस्था आणि जेवण) च्या थकबाकीमुळे मला यंदा प्रवेश नाकारला गेला आहे. मला कोणत्याही सवलतीची आवश्यकता नाही. आम्हाला वेळ द्या आम्ही फी देतो. माझे पालक फी देतील. ” तिने ९ वी मध्ये ९६ टक्के गुण मिळविले हेत. कृपया मला दहावीची परीक्षा लिहिण्याची संधी द्या,” असे मुलीने मंत्र्यांना सांगितले.
दरम्यान मुलीला परीक्षेस बसण्याची अनुमती न दिल्याची बाब मंत्री एस. सुरेशकुमार यांच्या निदर्शनास येताच त्याने मुलीला फोनवर बोलून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शनिवारी, मंत्री मुलीला भेटले आणि सांगितले की अद्याप तिच्याकडे पुरवणी परीक्षेला जाण्याची संधी आहे, असे तिला सांगितले. तसेच मंत्री एस. सुरेश कुमार यांनी तिला असेही सांगितले की बरीच मुले तिच्यासारख्या समस्यांना सामोरे जात आहेत आणि तेथे जाण्याचा मार्ग असल्याने फी वरून घाबरून चिंता करण्याची गरज नाही, अशी माहिती मंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
कर्नाटक सरकारने १९ आणि २२ जुलै रोजी एसएसएलसीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपारिक परीक्षेप्रमाणे या वेळी ओएमआर शीटच्या सहाय्याने ही परीक्षा घेण्यात येईल. पहिली ते नववी आणि पीयूसी -१ आणि पीयूसी -२ च्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण पदोन्नती देणाऱ्या सरकारने विद्यार्थ्यांचा प्रवाह निवडणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून एसएसएलसी परीक्षा घेण्याचे ठरविले.