बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारी मेडिकल ऑफिसर्स असोसिएशनने (केजीएमओए) पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी संप पुकारला होता. संपाच्या चौथ्या दिवशी संघटनेने संप मागे घेतला आहे. विविध मागणीसाठी डॉक्टर मंगळवारपासून संपावर गेले होते. आरोग्यमंत्री बी.आर. श्रीरामुलू यांनी शुक्रवारी केजीएमओए अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर स्वत: हून ट्विट करून संप मागे घेतल्याची घोषणा केली. यावेळी मंत्री श्रीरामुलू यांनी बैठक घेऊन मागण्या मान्य करत संप मागे घेण्याची विनंती केली.
केजीएमओएचे अध्यक्ष डॉ. जी. अ. श्रीनिवास यांनी, डॉक्टरांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्या दृष्टीने संप मागे घेण्यात आला आहे. या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने 125 कोटीरुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
केजीएमओएच्या बॅनरखाली केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या प्रमाणानुसार पगाराची मागणी करणारे सरकारी डॉक्टर मंगळवारपासून संपावर होते. केजीएमओएचे अध्यक्ष डॉ. जी. ए. श्री निवास यांच्या मते वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तुलनेत इतर डॉक्टरांचे पगार कमी आहेत. वैद्यकीय शिक्षण विभाग किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या प्रमाणानुसार पगार देण्यात यावा. केजीएमओए दीर्घ काळापासून याची मागणी करत आहे. चार हजाराहून अधिक चिकित्सक केजीएमओएचे सदस्य आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.