बेंगळूर : परिवहन कर्मचारी तात्काळ कामावर हजर न राहिल्यास त्यांचे वेतन कपात करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिला आहे. रायचूर जिल्हय़ातील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. संपाला संबंधित कोणालाही चर्चेसाठी आवाहन करणार नाही. तसेच याविषयावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कर्मचाऱयांनी आदराने कामावर हजर रहावे. वाहतूक व्यवस्थेत झालेल्या समस्यांना परिवहन कर्मचारीच जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील पोटनिवडणुकीत जनतेचा कौल भाजपच्या बाजूने असल्याने मतदारांनी भाजप विरोधात बोलणाऱया माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमारांना योग्य धडा शिकवतील, असेही ते म्हणाले.
Previous Article‘मस्की’ पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह
Next Article ‘परिवहन’चा संप आजही सुरूच राहणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.