पिंपरी / प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाच्या माजी पदाधिकाऱयांनी महासंघाकडून केल्या जाणाऱया प्रत्येक कामात स्वार्थ पाहिला. कर्मचाऱयांनी दुजाभावाची वागणूक दिली. कामगार भवन, पालखी, पेन्शन, धन्वंतरी योजना, पतसंस्था, दिवाळी फराळात देखील भ्रष्टाचार केला. आता कर्मचाऱयांची सहनशक्ती संपली असून शनिवारी होणाऱया निवडणुकीत कर्मचारी घोटाळेबाजांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास ‘आपला महासंघाचे पॅनल’ प्रमुख अंबर चिंचवडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, सर्व आरोपांचे आपल्याकडे पुरावे आहेत. न्यायालयात जाऊन यांचा मनमानी कारभार उघडकीस आणला. त्यांच्या मनमानी, दादागिरीच्या कारभाराला साथ न दिल्यामुळे आमच्यामुळे निवडणूक लादल्याचा आरोप केला जात आहे. असेही चिंचवडे म्हणाले
अंबर चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली आपला महासंघ पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी बुधवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पॅनलचे उमेदवार अभिमान भोसले, सुप्रिया सुरगुडे, योगेश रसाळ, बाळासाहेब कापसे, अविनाश ढमाले, धनाजी नखाते, गोरख भालेकर, शुभांगी चव्हाण, विलास नखाते, अमित जाधव, सुरेश गारगोटे, बाळू साठे, अनिल राऊत, धनेश्वर थोरवे, अविनाश तिकोणे, रणजीत भोसले, सुभाष लांडे, मिलिंद काटे, नवनाथ शिंदे, योगेश वंजारे उपस्थित होते.
चिंचवडे पुढे म्हणाले, आमच्या पॅनलमधील सर्व उमेदवार उच्चशिक्षित असून यंदा महासंघात नक्की परिवर्तन होणार, काही ठराविक पदाधिकाऱयांच्या स्वार्थापोटी महासंघाला लागलेले ग्रहण सुटणार आहे. कामगारविरोधी ढोंगी, फसव्या, घोटाळेबाजांना त्यांची जागा कामगार दाखवून देईल. माजी अध्यक्षांनी केवळ कंत्राटे मिळविणे, ठेकेदारी करणे, जवळच्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे काम केले आहे. कर्मचारी बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांना सवलतीच्या दरात औषधे मिळावीत यासाठी कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून महासंघ मेडिकल सुरु केले. या पदाधिकाऱयांनी यामध्ये देखील भ्रष्टाचार केला. कर्मचारी पतसंस्था म्हणजे महापालिका कर्मचाऱयांची आर्थिक अशा आणि आकांक्षा आहे. अशा या पतसंस्थेतही महासंघाच्या पदाधिकाऱयांनी अनेक घोटाळे केल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले आहे. कर्मचाऱयांच्या न्याय हक्कासाठी लढणे सोडून त्यांच्या जिवावर माजी अध्यक्षांनी ठेकेदारी करण्याचा धंदा सुरु केला आहे. त्यामुळे अशा अध्यक्ष आणि पदाधिकाऱयांना आता कामगार त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला
चौकट
हे आहेत आक्षेप
कामगार भवनामध्ये 5 कोटी रुपयांचा गैरव्यवहार
पेन्शन योजना अंशदान कर्मचाऱयांनाही लागू करण्याचे पोकळ आश्वासन
दिवाळी फराळात गोलमाल
पालखी सोहळय़ातील भाविकांना अन्नदान करण्यासाठी दहशतीच्या जोरावर जबरदस्तीने वर्गणी
कर्मचाऱयांसाठी वरदायिनी ठरणारी धन्वंतरी योजना गैरव्यवहार