बेळगावच्या तरुणांचे स्टार्टअप पुण्यात चमकले
प्रतिनिधी /बेळगाव
शेतीच्या मशागतीसाठी येणारा खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी शेती सोडून पर्यायी मार्गाचा अवलंब करीत आहे. मशागतीतील खर्च कमी करण्याचा प्रयत्न बेळगावच्या तरुणांनी केला आहे. कल्टीवेटर व रोटावेअर एकाचवेळी मारले जाईल, असे यंत्र त्यांनी विकसित केले आहे. यामुळे शेतकऱयांच्या मशागतीचा खर्च कमी होणार आहे. त्यांनी केलेले हे इनोव्हेशन पुणे येथे झालेल्या स्पर्धेतही चमकले. त्यांच्या स्टार्टअपला 5 लाख रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
अब्दुलजब्बार खान, अभिषेक बेंगळगी, निखिल पाटील व राहुल गुंजाळ यांनी धारवाड येथील कृषी व्यवसाय इनक्मयूबेटरच्या साहाय्याने कृषीयंत्र तयार केले. त्यांच्या किसान कनेक्ट एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱयांच्या सोयीसाठी कल्टीवेटर व रोटोवेटर मशीन तयार करण्यात आली. यापैकी दोघांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले असून एकाने बीएस्ससी पूर्ण केली आहे. तर एकटा सध्या इंजिनिअरिंग करीत आहे. मशागतीसाठी शेतकऱयांचा लागणारा वेळ व पैसा वाचविण्यासाठी नवीन यंत्र तयार करण्यात आले आहे. त्यामुळे जे काम करण्यासाठी 5 तासांचा कालावधी लागत होता, त्यासाठी आता 3 तास लागणार आहेत. तसेच एकाचवेळी कल्टीवेटर व रोटावेअर झाल्याने पैसेही वाचणार आहेत. झाडशहापूर येथील शेतांमध्ये या यंत्राचा वापर करण्यात आल्याचे या तरुणांनी सांगितले. पुणे येथे केपीआयटी स्पार्कल इनोव्हेशन स्पर्धा पार पडली. यामध्ये 800 हून अधिक महाविद्यालयांमधील 15 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. नाविन्य व संशोधन असणाऱया प्रयोगांना या स्पर्धेत बक्षीस दिले जाते. बेळगावच्या तरुणांनी यामध्ये भाग घेऊन इलेक्ट्रिक टॅक्टरसाठी मल्टीफंक्शनल रेट्रोफिट मशीन सादर केले. परीक्षकांनी या इनोव्हेशनला द्वितीय क्रमांक दिला. या इनोव्हेशनसाठी एस. जी. बाळेकुंद्री कॉलेजचे या तरुणांना सहकार्य मिळाले.