कुष्टगी न्यायालय आवारात विष पिऊन संपविले जीवन
प्रतिनिधी / बेळगाव
प्रसिध्द कन्नड सीने गीतकार के. कल्याण दांपत्यात वितुष्ट निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेली ज्योती उर्फ गंगा कुलकर्णी (वय 45) हिने न्यायालय आवारात विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कोप्पळ जिह्यातील कुष्टगी येथे ही घटना घडली आहे.
एक महिन्यांपूर्वी माळमारुती पोलीस स्थानकात गंगा विरुध्द अपहरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तेंव्हापासून ती फरारी होती. पोलिसांचा ससेमीरा चुकविण्यासाठी ती पळत होती. एका फसवणूक प्रकरणाच्या सुनावणीसाठी गंगा गुरुवारी कुष्टगी न्यायालयात आली होती. न्यायालयात हजर होण्यापूर्वीच तीने विष प्राशन केले होते.
न्यायालयात प्रवेश करताच ती अत्यवस्थ झाली. न्यायालयातच कोसळली. तीला तातडीने सरकारी इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता तीचा मृत्यू झाला. न्यायाधीशांना उद्देशून तीने मराठीतून एक पत्र लिहिले असून आपण कशासाठी आत्महत्या करीत आहोत, याचा उल्लेख तीने केला आहे.
माजी कर्मामुळे माझ्या जीवनाचा सर्वनाश झाला आहे. म्हणून मला आत्महत्या करावी लागत आहे. माझ्या दोन मुलांची व्यवस्था करावी, अशी विनंती गंगाने आपल्या पत्रात केली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून कुष्टगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
तीन वर्षांपूर्वी नोकरी लावण्याचे सांगून सुमारे 20 तरुणांकडून पैसे उकळल्याच्या आरोपावरुन गंगा कुलकर्णी विरुध्द कुष्टगी पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. क्मयादीगुप्प येथील संतोष कुलकर्णी या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी ती कुष्टगीला आली होती.
बिळगी जि. बागलकोट येथील शिवानंद वाली (वय 38) या मांत्रिकाच्या मदतीने के. कल्याण दांपत्यात वितुष्ट निर्माण केल्याच्या आरोपावरुन 30 सप्टेब्ंार रोजी शिवानंद व गंगा या दोघा जणांविरुध्द माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी शिवानंद वालीला अटक करुन सुमारे कोटीची मालमत्ता जप्त केली होती. सध्या शिवानंद जामीनावर आहे. गंगाने आत्महत्या केली आहे.