प्रातिनिधी/मुंबई
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप शिवसेना आणि खुद्द महापौरांनी केला होता. यानंतर राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. यासंदर्भात आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला तरी शिवसेना मात्र शेलारांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीये. आशिष शेलार यांच्यावर बोचरी टीका करणारे पोस्टर्स मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजपा प्रदेश कार्यालय समोर रात्री लावण्यात आले होते. यामध्ये आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या वेषात दाखवण्यात आलंय आणि त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
दरम्यान, आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्या वादानंतर आता महापौरांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौर पेडणेकर यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना गुरुवारी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर पोलिसांत तक्रार दाखल करणार असून कुटुंबियांसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहेत. या पत्रात माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका अशा आशयाचे पत्र महापौर यांना पाठवण्यात आले आहे. यांनतर महापौर पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका स्पष्ट केली. यावेळी महापौर पेडणेकरांनी पत्रात करण्याच आलेले शब्दप्रयोग क्लेशदायक असल्याचं यावेळी महापौरींनी सांगितलं. तसेच, “मला काहीही झालं तरी चालेल, पण माझ्या कुटुंबाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही”, असं महापौरांनी ठणकावून सांगितलं आहे. हे सांगत असताना मात्र पेडणेकऱ्यांच्या डोळ्यात आले होते. यासर्व प्रकारांनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत शेलारांचे तमाशातील नाच्याच्या वेषात पोस्टर लावले आहे.