कसबे डिग्रज / वार्ताहर
अलीकडच्या काळात निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटनासाठी नावारूपास येत असलेल्या कसबे डिग्रज बंधाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी पंचक्रोशीतील लोक मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. रविवारी सायंकाळी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने बंधाऱ्याला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. संचारबंदी असून देखील बंधाऱ्यावर युवक युवती यांच्यासह प्रेमी युगुलांनी मोठी गर्दी केल्याची माहिती मिळताच पोलीस बांधवांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.
यावेळी विनाकारण तसेच विनामास्क फिरणाऱ्या लोकांना एम. चव्हाण, एस.पी.आवळे, आर.व्ही.पाटील, सी.जि. व्हनवाड आदींसह पोलीस बांधवांनी समज देऊन सोडुन दिले. मोठ्या प्रमाणात युवक जमा होत असल्याने हुल्लडबाजी वाढून छोटे मोठे वादास कारणीभूत ठरत आहेत, त्याचबरोबर याचा स्थानिक रहिवाशांना देखील त्रास होत आहे.