ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींच्या कोअर टीमचा भाग असलेले माजी केंद्रीय मंत्री रतनजीत नारायण प्रताप उर्फ आरपीएन सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आरपीएन सिंह यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आरपीएन सिंह यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला आहे. त्यामध्ये सिंह यांनी म्हटले आहे की, आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, तेव्हा मी माझ्या राजकीय जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे. जय हिंद.’ देश, जनता आणि पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो.
आरपीएन सिंह हे पदरौना राजघराण्यातील आहेत. ते कुशीनगरचे खासदार होते. मागील काही दिवसांपासून आरपीएन सिंग काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ट्विटरवर बायो देखील बदलला आहे.