तृणमूल काँग्रेसचे पर्वन वर्मा यांची टीका
प्रतिनिधी /पणजी
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. पवन वर्मा यांनी काँग्रेस नेते चिदंबरम यांवर निशाणा साधून म्हटले की त्यांनी नियोजनबद्धरित्या काँग्रेस सोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेसने प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी स्वतः जिकंण्यापेक्षा भाजपला मदत करण्यात स्वारस्य आहे, अशी टीका वर्मा यांनी केली आहे.
पत्रकार परिषदला सबोधतांना गोवा तृणमूल काँग्रेसच्या महिला अध्यक्षा श्रीमती अविता बांदोडकर, गोवा तृणमूल काँग्रेसचे युवा अध्यक्ष श्री. जयेश शेटगांवकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री पवन वर्मा यांनी म्हटले की ’मी चिदंबरम यांना भेटण्यासाठी दिल्ली येथे 24 डिसेंबर रोजी दुपारी 1ः30 वाजता गेलो होतो. मी गोव्याची परिस्थिती बद्दल बोलण्यासाठी तिथे गेलो होतो आणि भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी आपण एकत्र यावे म्हणून आम्ही किमान एक तास चर्चा केली पण त्यांनी काहीच प्रतिउत्तर दिले नाही.’
काँग्रेस विपक्षाची भूमिका निभावण्यात सुद्धा अपयशी ठरली आहे. ’2012 पासून काँग्रेस पक्ष सध्याच्या केंद्रीय नेतृत्वात 90ज्ञ् निवडणूक हरली तरी सुद्धा ते काहीच परिवर्तन न करता लढत आहे, जर काँग्रेस पार्टी लढा देण्यात अपयशी ठरत असेल तर त्यांनी आपल्या नेतृत्वात परिवर्तन करावा.’
तृणमूल गोव्यात मत विभागणी करायला आली आहे अशा खोटा प्रसार काँग्रेसने जरी केला असेल पण सत्यता हे आहे की काँग्रेस स्वतः भाजप विरोधी मातांना विभागण्याच्या तयारीत आहे.
गोवा तृणमूल काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा अविता बांदोडकर यांनी म्हटले की ’ममता दीदी एकमेव नेतृत्व आहे जे हुकूमशाही भाजप सरकार विरोधात लढू शकते. काँग्रेस आमच्यावर वोटकाप्या असण्याचा आरोप करते पण ते स्वतःचा 2017 विसरले जेव्हा त्यांचे अनेक आमदार पक्ष सोडून भाजप मध्ये गेले आणि त्यांनी जनमताचा अपमान केला. आता काय हमी आहे की पुन्हा तसा होणार नाही ?’
गोवा तृणमूल काँग्रेस युवा अध्यक्ष जयेश शेटगांवकर यांनी म्हटले की ’मी गोवेकरांशी विनंती करतो की त्यांनी आपला बहुमूल्य मत काँग्रेस वर वाया घालू नये, काँग्रेसला वोट देणे म्हणजे ते वोट समोर जाऊन भाजपलाच उपयोगी पडेल, कारण तुम्ही जरी काँग्रेसला वोट दिले तरी ते भाजपसोबत जाणार. तृणमूल काँग्रेस एक पर्याय म्हणून गोवेंकरांच्या समोर उपस्थित आहे जे भाजपचा पराभव करण्यास सक्षम आहे. आम्ही भाजपला गोव्यातून हद्दपार करू आणि यासाठी जीवतोड प्रयत्न करू.