गोकुळ शिरगाव प्रतिनिधी
कागल पंचतारांकित एमआयडीसी मधील गौरीहार इंजिनिअरिंग वर्क्स (बी 17) या कंपनीमध्ये मशीन वर काम करत असताना सागर महादेव स्वामी (वय 37) राहणार पंचशील कॉलनी, पाचगाव ता. करवीर हे मयत झाले. हा अपघात गुरुवार दिनांक 7 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास झाला. जखमीस सीपीआरमध्ये उपचारासाठी नेले असता तेथे त्यांना मयत घोषित केले. याबाबतची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून या घटनेची वर्दी डॉ. नवज्योत सीएमो सीपीआर हॉस्पिटल यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि अविनाश माने करीत आहेत.