प्रतिनिधी/ कागवाड
सहकार महषी, दत्त साखर कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार, दिवंगत डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कागवाड येथे ऊसतोड मजुरांना धान्यांचे किटचे वाटप करण्यात आले. शुक्रवारी सकाळी कागवाड येथे दत्त कारखानाच्या शाखा कार्यालयात कागवाडचे “दादारी फाउंडेशन’’चे अध्यक्ष राजगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिरोळच्या दत्त साखर कारखान्यात कर्नाटकाचे 9 संचालक आहेत. कागवाड येथे सतत 20 वर्षे कारखान्याचे संचालक व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले दिवंगत सिद्दगौडा पाटील तसेच कृष्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिवंगत ज्योतगौडा पाटील यांच्या स्मरणार्थ “दादारी फाउंडेशन’’ची स्थापना करण्यात आलेली आहे. या फाउंडेशनच्यावतीने गरिब मजुरांना आहाराचे किट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी दादारी फौंडेशनचे संचालक ज्योतीकुमार पाटील, काकासाहेब पाटील, शेखर पाटील, शशिकांत घुमटे, बसनगौडा पाटील, राजू कुसनाळे, चेतन पाटील, गोटू बिंदगे, बाळासाहेब कल्लोळे, कारखान्याचे अधिकारी दीपक कोळेकर, गजानन घाटे, सुनील पाटील आदी उपस्थित हेते.