ऑनलाईन टीम / काबुल :
काबूल शहरातील पोलीस जिल्हा-10 मधील लष्करी रुग्णालयाजवळ मंगळवारी दोन बॉम्बस्फोट झाले. पहिला स्फोट सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर तर दुसरा स्फोटही याच रुग्णालयाच्या परिसरात झाला. या स्फोटात 19 नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला असून, 50 जण जखमी झाले आहेत. बॉम्ब स्फोटानंतर या भागात काही काळ गोळीबारही सुरू होता. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या स्फोटांबद्दल तालिबानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आली नाही.