ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर देशभरात भीतीचे वातावरण आहे. अनेक लोक भीतीपोटी देश सोडून पळून जात आहेत. त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न अनेक दहशतवादी संघटना करत आहेत. आज काबुल विमानतळावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत अफगाण सुरक्षा दलाचा एक जवान ठार झाला. इतर तीन जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीलाही काबुल विमानतळावर देश सोडण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर गोळीबार झाला. या गोळीबारात पाच जण ठार झाले होते. दरम्यान, गेल्या रविवारी पुन्हा गोळीबार झाला, ज्यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता.