प्रतिनिधी / सातारा
कोरोना फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीतही जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिस 24 तास कार्यरत आहेत.पण त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ठाण्याला निर्जंतुक करण्यासाठी कामथी (ता.सातारा)येथील शेतकरी शांताराम देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपली शेतातील सारी कामे बाजूला ठेवून शाहुपुरी पोलीस ठाणे, सातारा शहर पोलीस ठाणे व पोलीस चौकी व बंदोबस्तासाठी ज्या ठिकाणी उभे असतात त्या ठिकाणी औषध फवारणी केली आहे. या कामाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.