वार्ताहर/ रामनगर
बेळगाव-कारवार मार्गावर जगलबेट-चांदेवाडी क्रॉसजवळ शनिवारी दुपारी रामनगर येथून जोयडा येथे जात असलेली बोलेरोला समोरुन अंगावर येत असलेल्या अज्ञात वाहन चुकविण्याच्या भरात बोलेरो वाहन शेजारील झाडाला आदळून काही अंतरावर कलंडली. तर सदर वाहन चालक विठ्ठल शिंदे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला 108 रुग्णवाहिकेतून बेळगावला नेण्यात आले. अपघातात बोलेरोचा मात्र चेंदामेंदा झाला आहे. सदर घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे.