प्रतिनिधी / ओटवणे:
कारिवडे येथील श्री देवी कालिका देवीचा वार्षिक जत्रोत्सव 1 जानेवारी रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रम, रात्री पालखी मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी व रात्री 12 वाजता आरोलकर दशावतार नाटय़ मंडळाचा नाटय़प्रयोग होणार आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन गावकर व ग्रामस्थांनी केले आहे.