मंगेश तळवणेकर यांची सामाजिक बांधिलकी
ओटवणे /प्रतिनिधी-
कारीवडे गावात १२ कुटुंबे कोरोना बाधित आढळल्याने ही बाराही कुटुंबे विलगिकरणात आहेत. त्यामुळे त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी या कोरोनाबाधित कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.
गावातील कोरोना बाधित बारा कुटुंबे १७ दिवसांसाठी विलगिकरणात आहेत.त्यामुळे या कोरोनाबाधित कुटुंबाना साखर, तूरडाळ, वाटाणे, तेल, चहापावडर आदी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी या कोरोना बाधीत कुटुंबियांनी मंगेश तळवणेकर यांचे आभार मानले आहेत. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गावकर, बाळा गावकर, मनोहर गुरव, मंगेश पंधारे, अरविंद गावडे, यशवंत नाईक, भोरू जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मंगेश तळवणेकर यानी यापूर्वीही आपल्या गावाबरोबरच जिल्ह्यातील गरजूंना धान्य, मास्क, सॅनिटायजर वाटप, श्वानाना जेवण, लॉक डाऊनमध्ये अडकलेल्या सातशे ट्रक चालकांना दोन ट्रक धान्य आदी अनेक उपक्रम राबवले आहेत. मंगेश तळवणेकर यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.