कोलकाता
अमेरिकेतील कंपनी कार्लाइल गुपने पिरामल फार्मामधील 20 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. पिरामल फार्मा या गुंतवणूकीच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचा विस्तार करू पाहणार आहे. ही खरेदी 490 दशलक्ष डॉलर्सना झाल्याचे सांगण्यात येत आहे. कार्लाइल कंपनीने गुंतवणूकीबाबत समाधान व्यक्त केले असून भारतात आपल्याला एका नामांकीत कंपनीसोबत काम करणे अधिक आशादायी ठरणारे असेल. भविष्यकाळात अनेक गुंतवणुकीच्या संधी आपल्याला उपलब्ध होतील, असा विश्वासही कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केलाय. महिन्यापूर्वी कार्लाइल ग्रुपला भारतात फार्मा उद्योगात गुंतवण्याची इच्छा असल्यासंबंधी बोलले जात होते. अखेर कार्लाइलने पिरामलमध्ये गुंतवणूक करून आपले म्हणणे खरे करून दाखवले.