एपीएमसी पोलिसांची कारवाई, कार जप्त : पुढील तपास सुरू
प्रतिनिधी/बेळगाव
आठ दिवसांपूर्वी नेहरुनगर येथून मारुती 800 कार चोरल्याच्या आरोपावरुन शुक्रवारी एपीएमसी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून चोरीची कार जप्त करण्यात आली आहे.
एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मीटगार, डी. सी. सागर, शंकर कुगटोळी, नामदेव लमाणी, केंपान्ना दोडमनी, सोमू करलिंगण्णावर व त्यांच्या सहकाऱयांनी शुक्रवारी ही कारवाई केली आहे.
आठ दिवसांपूर्वी नेहरुनगर येथील डीमार्टच्या पार्किंगमधून मारुती-800 ची चोरी झाली होती. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली होती. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना अटक करुन चोरीची कार जप्त केली आहे. त्यांना बाल न्यायमंडळींच्या अध्यक्षांसमोर हजर करण्यात आले आहे. बेळगाव शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ा वाढल्या आहेत. वाहन चोरी प्रकरणांतही अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली आहे.