मांजरी / वार्ताहर
पोलीस कर्मचाऱ्यांची मोटरसायकल व कागवाड तहसीलदार यांची खाजगी कार यांच्यात टक्कर होऊन मोटारसायकलस्वार पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी मांजरी येथे घडली या घटनेची नोंद अंकली पोलीस ठाण्यात झाली आहे.
कागवाडच्या तहशीलदार प्रमिला देशपांडे या आपल्या पतीसह कारने कागवाडकडे जात होत्या. तर एेगळी पोलिस ठाण्याचे कर्मचारी शिवनगौडा पाटील हे आपल्या मोटरसायकलवरून कोगनोळी चेकपोस्ट येथे ड्युटीवर चालले होते. मांजरीनजिक दोन्ही वाहनांमध्ये धडक होऊन अपघात घडला यामध्ये तहशिलदार प्रमिला देशपांडे या किरकोळ जख्मी झाल्या. त्यांचे पती सुखरूप बचावले. पोलिस कर्मचारी पाटील हे गंभीर जख्मी झाले. त्यांना चिक्कोडी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अंकली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मणाप्पा आरी यांनी भेट देवून या घटनेची नोंद करून घेतली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.