वनविभाग पोलीस अधिकाऱयांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
कासवाची तस्करी करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱया एकाला वनविभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. बाळकृष्ण उर्फ खंडू नरसिंगरामू भोवी (वय 35, रा. कारजगा, ता. हुक्केरी) असे त्याचे नाव आहे.
कारजगा येथून महाराष्ट्रात कासव नेऊन त्याची विक्री करण्यासाठी त्याने घरासमोरील एका प्लास्टिक टँकमध्ये कासव ठेवले होते. याची माहिती वनविभाग पोलिसांना समजली. पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवून त्याला पकडले. बाळकृष्ण हा कासव घेऊन जाताना पोलिसांना पाहून त्याने पळ काढला. मात्र, पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले.
बाळकृष्णला अटक करून त्याच्याकडील 2 किलो 200 ग्रॅम वजनाचे कासव जप्त केले. वरि÷ पोलीस अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांचे सहकारी एस. आर. अरीबेंची, के. डी. हिरेमठ, बी. बी. इंगळगी यांनी ही कारवाई केली.