वार्ताहर / कास :
कास पुष्प पठारावरील नैसर्गिक रंगफुलांचा हंगाम अंतिम टप्यात आला असुन, पठारवर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ ओसरल्याचे या शनिवार-रविवारच्या सुट्टीत दिसून आले. ऑनलाईन बुकिंग १५ आक्टोबर पासून बंद केली जाणार असल्याची माहीती वनसमीतीकडुन देण्यात आली आहे.
पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडणारा कास पठारवरील नैसर्गिक रंगीबेंरीगी फुलांच्या हंगाम २५ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. राज्यासह देशविदेशातील पर्यटकांनी पठारला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आंनद लुटला. मात्र, पठारवर सर्वात जास्त आणि प्रमुख आकर्षीत ठरणारी गुलाबी तेरडा जातीची फुले आतिपावसामुळे अगदी कमी प्रमाणात उमलल्याने पर्यटकांची नाराजी पाहावयास मिळाली. मात्र, पांढरा निळा गेंद, कापरू, पिवळी मिकी माऊस व कुमुदिनी तळ्यातील कमळे ही जास्त प्रमाणात बहरल्याने पर्यटकांची खास आकर्षण ठरत होती. आता पठारवर तुरळक प्रमाणात पांढरा गेंद, पिवळी मिकीमाऊस व इतर जातीची फुले आहेत. मात्र, जास्त प्रमाणात गवत वाढल्याने ती कमी प्रमाणात दिसत आहेत.
पठारवरील फुलांचे प्रमाण कमी झाल्याने आता येणारे पर्यटक कास तलाव व कोयना जलाशयातील बामणोली बोट क्लबला भेट देऊन वासोटा ट्रेकिंगसह बोंटीगचा आनंद लुटत आहेत.