वार्ताहर/ भुईंज
पश्चिम महाराष्ट्रातील दिवसा छबिना होणारी व पारंपारिकता जपणारी मौजे किकली ता।वाई येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा शनिवार व रविवार रोजी येत असून सदर यात्रा कोविड 19 कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली असून भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने दिपक बाबर पाटील यांनी केले आहे।
भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने दिपक बाबर पाटील यांनी पत्रकारांना महिती देताना सांगितले की किकली गावचे ग्रामदैवत भैरवनाथ हे जिल्हयातील तमाम लोकांचे द्धास्थान असून येथे दरवर्षी भाविक या यात्रे निमित्त मोठया संख्येने उत्सावाने येत असतात। हा यात्रा उत्सव भुईंज पाचवडसह तालुक्याच्या पुर्व भागातील अनेक वाडया वसाहतींच्या गावांचा उत्सव असतो। बारा बलुतेदार मानकरी सालकरी सेवेकरी यांचा सहभाग जांबचे ग्रामदैवत देवी चिलाई व भैरवनाथ या बहिण भावांची पालखी सोहळा भेट परिट समाजाची टक्कर आदी रितीरिवाजांच्यामुळे किकलीचा यात्रा उत्सव हा लोकसोहळा म्हणून जिल्हाभर साजरा होत असतो। परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियम सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने आमलात आणावेत यासाठी वाईचे तहसीलदार रणजीत भोसले भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि शाम बुवा यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ यावर्षीचा यात्रा उत्सव साजरा करणार नाहीत असे सांगण्यात आले आहे।
किकलीचे भैरवनाथचे मंदिर हे पांडवांनी एक रात्रीत बांधले असून संपुर्ण दगडी पाषाणात कोरीव काम करून आज हि वास्तू कलेला अभ्यासाचा विषय ठरलेला आहे। भारत सरकारने हे मंदिर पुरातत्व विभागाकडून संरक्षित केले आहे। त्यामुळे पर्यट़क संशोध़क भाविक यांची नेहमी ये जा असते। परंतु कोरोनामुळे त्यांना हि गेली कित्येक महिने मंदीर परिसर बंद असल्याने व एस टी महामंडळाची वाहुतक बंद असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहे।