मुंबई
किया या भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनीने केवळ 11 महिन्यात 1 लाख कार विक्रीचा विक्रम करत नवा अध्याय रचला आहे. ऑगस्ट 2019 मध्ये कंपनीने सेल्टॉस ही गाडी बाजारात दाखल केली होती. कियाच्या 97 हजार 745 सेल्टॉस सुव्ह गाडय़ा आणि 3 हजार 614 कार्नीव्हल गाडय़ा गेल्या 11 महिन्यात विकल्या गेल्या आहेत.
कियाने सेल्टॉस ही सुव्ह गटात भारतात गाडी दाखल केल्यानंतर केवळ दोनच महिन्यात या गाडीने लोकप्रियता मिळवण्यात यश मिळवलं. भारतातल्या पाच टॉप मोटारींमध्ये सेल्टॉसने प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. कंपनीने सुरूवातीपासूनच आपली कामगिरी उंचावत नेली आहे. सेल्टॉसनंतर कंपनीने लक्झरी एमपीव्ही गटात कार्नीव्हल ही गाडी वर्षाच्या सुरूवातीला बाजारात दाखल केली. केवळ 2 कार्स मॉडेल्सच्या माध्यमातून विक्रमी 11 महिन्याच्या कालावधीत कंपनीने केलेली कामगिरी नोंदणीय ठरली असल्याची प्रतिक्रीया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुख्युन शिम यांनी दिली आहे.