प्रतिनिधी /बेळगाव
तीर्थकुंडे येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रोत्सवाला दि. 29 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. अक्षतारोपण सकाळी 7 वा. 08 मी. च्या मुहूर्तावर झाले. किशोर देशपांडे/ चेअरमन व श्री शरद देशपांडे/ खजिनदार यांनी सपत्नीक देवक ठेवले व यात्रा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत यात्रोत्सवाला सुरुवात झाली. पौरोहित्य राजाभाऊ जोशी यांनी केले.
तरुण भारतचे समूह प्रमुख व संपादक किरण ठाकुर, बाळासाहेब काकतकर, नारायण किटवाडकर, सुहास किल्लेकर, श्रीकांत देसाई, प्रकाश इजरे, मिलिंद देशपांडे, आप्पा शेणवी यांनी मंगळवारी सकाळी या यात्रोत्सवाला भेट दिली.
यावेळी किरण ठाकुर यांनी ग्रामस्थांना गावाच्या विकासासंबंधित मार्गदर्शन केले व रामलिंग देवस्थान परिसराचा विकास पर्यटनस्थळ म्हणून व्हावा, अशी इच्छा व्यक्त करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व शुभेच्छा दिल्या. या यात्रोत्सवाची सांगता गुरुवार दि. 6 रोजी सायंकाळी 5 वा होणार आहे.