प्रतिनिधी/ भुईंज
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी (आसवणी) युनिटसाठी स्वतंत्रपणे उभारण्यात आलेल्या बॉयलरचा अग्नग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक मधुकर शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी पार्वतीताई शिंदे या उभयतांच्या हस्ते पार पडले आहे.
कारखान्याची प्रतिदिन एक लाख लिटर क्षमतेची डिस्टीलरी, इथेनॉल आणि इएनए प्रकल्प हे सर्व युनिट गळित हंगाम काळासह बारमाही चालावेत, आवश्यक दाबाची स्टीम उपलब्ध व्हावी, जास्तीत जास्त उत्पादन घेता यावे यासाठी स्वतंत्र दहा टनी मल्टीफ्युएल बॉयलरची उभारणी डिस्टीलरी परिसरात उभारणी करण्यात आलेली होती. बगॅस, लाकूड, कोळसा आणि बायोगॅस अशा बहुविध इंधनाचा वापर या बॉयलरसाठी करण्यात येतो. या बॉयलरमुळे डिस्टीलरीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास मदत होत आहे. आज शिंदे दांपत्याच्या हस्ते विधिवत पुजनानंतर बॉयलर प्रदीपन करण्यात आले. कारखान्याचे संचालक मधुकर शिंदे व पार्वतीताई शिंदे यांच्यासह बॉयलर विभागातील कर्मचारी यशवंत बाबर, संजय शिंगटे, विठ्ठल जाधव, सुर्यकांत सावंत, वीरसेन गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, प्रतापगड कारखान्याचे कार्यकारी संचालक व डिस्टीलरी मॅनेजर एस. वाय. महिंद, सेक्रेटरी एन. एन. काळोखे, चीफ इंजिनिअर के. एस. पाटील, चीफ केमिस्ट विकास गाढवे, इन्चार्ज ऍग्री मॅनेजर विठ्ठल कदम, एचआर मॅनेजर ए. टी. शिंगटे, को-जन मॅनेजर डी. आर. वाघोले, सुरक्षा अधिकारी एस. एम. बर्गे, इन्चार्ज सिव्हिल इंजिनियर प्रकाश कदम, प्रतापगड कारखान्याचे चीफ केमिस्ट राजेंद्र पाटील, परचेस इन्चार्ज संतोष जगताप, लिगल इन्चार्ज शिवाजी फरांदे, हेवी व्हेईकल इन्चार्ज राजेंद्र भोइटे, सेफ्टी ऑफिसर सचिन शिंदे यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.