अध्यक्षीय भवनातून जेलेंस्की यांची गर्जना
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर जेलेंस्की यांनी पोलंडमध्ये पलायन केल्याच्या अफवा फेटाळून लावत अध्यक्षीय भवनातील स्वतःचा व्हिडिओ शेअर केला आहे. मी राजधानी कीव्हमध्येच आहे आणि कुणालाच घाबरत नाही. आपण कुठल्याच बंकरमध्ये लपलेलो नाही आणि देशभक्तीने भारलेले हे युद्ध जिंकेपर्यंत कीव्हमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेलेंस्की यांनी अध्यक्षीय भवनातून स्वतःचा व्हिडिओ जारी करत रशिया आणि स्वतःच्या जनतेला संदेश दिल्याचे मानले जातेय.
राजधानी कीव्हमधील अध्यक्षीय भवनाच्या कॉरिडॉरमध्ये हिंडतानाचा व्हिडिओ त्यांनी तयार केला आहे. रशियाच्या सैन्याने राजधानी कीव्हला चहुबाजूने घेरलेले असताना जेलेंस्की जगासमोर आले आहेत. जेलेंस्की यांनी देश सोडून जाण्याचा प्रस्ताव मान्य करण्याऐवजी राजधानीत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.