मासळीवाहून कंटेनर घुसला दुकानातदुकानावर गिऱ्हाईकवाला युवक ठार
प्रतिनिधी/ फेंड़ा
फोंडा-पणजी महामार्गावर मानसवाडा कुंडई येथे मासळीवाहू कंटेनर नाक्यावरील दुकानात घुसून झालेल्या भीषण अपघातात एक युवक ठार तर सहाजण जखमी झाले. अपघाताची घटना काल बुधवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली. सामान घेण्यासाठी दुकानात आलेला सुकेश दिनेश बसक (32, मूळ प.बंगाल, रा. कुंडई) ढिगाऱ्याखाली अडकून ठार झाला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मासळीवाहू कंटेनर केएल 07 सीपी 2580 बंगळूरहून गोवामार्गे रत्नागिरी जाण्यासाठी निघाला होता. फोंडयाहून पणजीच्या दिशेने जात असताना मानसवाडा कुंडई येथील उतरणीवर चालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने कंटेनर सरळ उतरणीवरून खाली येत जन्क्शनवरील दुकानात घुसला. यावेळी दुकानात गिऱ्हाईक म्हणून आलेला सुकेश तावडीत सापडला. धडक एवढी जबरदस्त होती दुकानाचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. दोघेजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एक किरकोळ जखमांवर बचावला तर ढिगाऱ्याखाली सापडलेल्या सुकेशला फोंडा येथील इस्पितळात दाखल करेपर्यंत मृत्यू झाला होता.
दुकान विशांत नाईक यांच्या मालकीचे असून मागील वर्षापासून ते एक बिगरगोमंतकीय चालवित होता. नाक्यावरील दुकानासमोर मोटरसायकल पायलट, दुकानाच्या ओसरीत दोन महिला गावठी भाजी विक्री करीत होती. तसेच त्याच्या बाजूला दोघेजण आकड्याचा बाजार चालवित होते. सर्वजण किरकोळ जखमांवर सुखरूप बचावले मात्र काहीवेळ ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सुकेशचा दुर्दैवी अंत झाला.
जखमी झालेल्यांमध्ये भाजीविक्रेती दर्शनी दयानंद गावडे (45, कुंडई), लक्ष्मी उर्फ येसू जल्मी (50, कुंडई), दोघे कंटेनर चालक बिजील थॉमस (28, कोची), कंटेनर चालक शरद (34, केरळ), उमाजी दीपक नानूसकर (31, तिरोडा-महाराष्ट्र), विश्वजित मसकर (29) दोघेही गिऱ्हाईक म्हणून दुकानात दाखल झाले होते. चार जखमीना उपजिल्हा इस्पिळात दाखल करण्यात आले असून विश्वजित व चालक शरद याला बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
‘गुगल पे करण्यासाठी सरकला आणि बचावलो’
उमाजी नाणूसकर हा सामान खरेदीसाठी आला होता. त्याच्यापाठोपाठ मयत सुकेश हा सामान घेण्यासाठी उभा होता. सामान घेतल्यानंतर उमाजीने गुगल पे वरून पैसे देण्यासाठी तो स्कॅनरजवळ सरकला आणि सुकेश त्याच्याजागी पोचला. नेमका त्याचवेळी ही घटना घडल्याने सुकेशवर ढिगारा कोसळल्याने तो मरण पावला. उमाजी किरकोळ जखमावर बचावला असून फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात उपचार घेत आहे.
दुकान चालविणारे मामा-भाचे दोघेही सुखरूप, गिऱ्हाईक ठारनाक्यावरील किराणा दुकात विशांत विश्वजित नाईक यांच्या मालकीचे असून मागील काही वर्षापासून त्याने ते सुबोध कुमार नामक व्यक्तीला भाड्याने चालविण्यासाठी दिलेले आहे. सुबोधकुमारसह त्याचा भाचा उमेश कुमार दोघेही हे दुकान सांभाळीत होते. अपघातात सुदैवाने दुकानात असलेले दोघेही मामा-भाचे बचावले तर गिऱ्हाईक व इतर जखमी झाले.