स्वयंचलीतपणे कचरा उचलणारी कुंडल ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली
कुंडल/प्रतिनिधी
गावातील वाढता कचरा व सफाई कर्मचार्यांची वाणवा यामुळे कचरा उचलण्यासाठी होणारी दिरंगाई यावर उपाय म्हणून जिल्हा परीषद सदस्य शरद लाड यांनी त्यांचौया निधीतून कुंडल ग्रामपंचायतीस कचरा उचालणेसाठी “जटायु” हे स्वयंचलीत पद्धतीने कचरा उचलणारे लिटल पिकर मशिन दिले असून अशा मशिनद्वारे कचरा उचलणारी कुंडल ग्रामंपचायत जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
कुंडल हे जवळजवळ तिस हजार लोकसंख्येचे गाव असून इथली बाजार पेठ मोठी असून गावाचा विस्तार ही मोठा असल्याने अन त्यातच ग्रामपंचायातीस सफाई कर्मचार्यांची समस्या भेडसावत असल्याने वारंवार स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असताना आधुनिकतेचा ध्यास असणारे जि.प. सदस्य शरद लाड यांनी यावर उपाय शोधून स्वयंचलीतपणे कचरा उतलणारे आठ लाख रु. किमतीचे “जटायु” हे लिटल पिकर मशिन जिल्हा परीषदेच्या निधीतून कुंडल ग्रामपंचायतीस भेट दिले आहे. आमदार अरुण अण्णा लाड, क्रांती दुध संघाचे अध्यक्ष किरण लाड यांचे उपस्थितीमध्ये या मशिनचा लोकार्पन सोहळा पार पडला.