प्रतिनिधी / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले येथे ग्रामपंचायत कुंभोज यांच्यावतीने 25 जानेवारी रोजीची महिला ग्रामसभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली, सदर ग्रामसभेचे आयोजन ग्रामपंचायत कुंभोज यांच्यावतीने करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी कुंभोज सरपंच माधवी माळी होत्या.
यावेळी ग्राम बाल संरक्षण समिती ग्रामस्थराव घटित करणे, बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम राबवणे, प्रधानमंत्री आवास रमाई आवास घरकुल आढावा घेणे, कुपोषित बालकांच्या मुलींच्या निर्मल याबाबत चर्चा करणे ग्रामपंचायत कुंभोज चे रूपांतर नगरपंचायत कुंभोज मध्ये करणे बाबत प्रस्ताव दाखल करणे, ग्रामपंचायत नवीन इमारत बांधकाम करता ग्रामपंचायत जवळील कन्या विद्यामंदिरची जागा मागणीचा प्रस्ताव करणे यासह आदि विषयांवर या ग्रामसभेत चर्चा झाली.
यावेळी उपसरपंच सुकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब डोने, सागर कांदेकर, जहांगीर हजरत दीपक कोल्हे, नंदकुमार माळी, पोलीस पाटील, मोहम्मद पठाण तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेवक आर. सी. पाटील व आभार अमर पवार यांनी मानले.