वार्ताहर/ कुद्रेमनी
ग्राम पंचायत कुद्रेमनी व प्राथमिक आरोग्य केंद्र उचगाव यांच्यावतीने कुद्रेमनीत गुरुवारी कोरोना रोग निर्मूलनाकरिता गुरुवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. 180 जणांना या दिवशी लसीकरण करण्यात आले.
यावेळी कर्नाटक काँग्रेस युवा कमिटीचे अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांनी सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, आरोग्याची काळजी घेऊन सकारात्मक दृष्टीने मानसिक धैर्य प्रबळ ठेवण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी ग्रा. पं. माजी सदस्य दिपक निं. पाटील, ग्रा. पं. उपाध्यक्ष विनायक ना. पाटील, सदस्य अरुण देवण, शिवाजी मुरकुटे, संजय पाटील, शंकर पाटील, रुक्माण्णा कागणकर, शाहू पाटील आदी उपस्थित होते.
लसीकरणाच्या कार्यासाठी ग्रा. पं. पीडीओ प्रकाश कुडची, सचिव हणमंत किल्लेकर, परिचारिका विजयालक्ष्मी, उल्का जाधव-पाटील, आशा कार्यकर्त्या नंदा पाऊसकर, आरती लोहार, सुनिता बिजगर्णीकर, नंदा शिंदे, सुरेश शिवणगेकर, प्रकाश कांबळे, आदींसह वैद्यकीय सेवा कर्मचाऱयांनी यावेळी परिश्रम घेतले.