प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी आगारात लावलेल्या ओमिनीची बॅटरी,अल्टरनेटर मशीन ,तांब्याची केबल अशी एकूण ७ हजारांची चोरी अज्ञात चोरट्याने केली असल्याची फिर्याद बाळकृष्ण पोपट कन्हेरे यांनी कुर्डुवाडी पोलिसांत दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बाळकृष्ण कन्हेरे हे कुर्डुवाडी आगारात सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्यावर असताना शुक्रवार दि.१८ रोजी कुर्डुवाडी आगारात आरटीओ अकलूज यांनी अपघात झालेल्या व इतर गाड्या लावलेल्या आहेत.त्याठिकाणी काहीतरी खोलल्याचा आवाज झाला त्यावेळी सुरक्षारक्षक कन्हेरे हे आवाजाच्या दिशेने गेले असता एम एच १२ ए एन ९१३० पांढऱ्या रंगाच्या ओमिनीजवळ एक इसम ओमिनी गाडीचे पार्ट खोलत होता. सुरक्षारक्षक येण्याची चाहूल लागताच तो तिथून पसार झाला.
याबाबत सुरक्षारक्षक कन्हेरे यांनी वाहतूक निरीक्षक शरद वाघमारे यांना फोनवरून माहिती देताच वाघमारे घटनास्थळी आले. त्यांनी वर्कशॉपचे प्रमुख कारागीर नागनाथ लोंढे यांना बोलावून सदर गाडीची काय चोरी झाली हे तपासणी केली असता बॅटरी, मशीन ,तांब्याची केबल अशी एकूण ७ हजारांची चोरी झाल्याची खात्री झाली. कन्हेरे यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.