ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.
कुलगाम जिल्ह्यातील निपोरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार शोधमोहीम हाती घेण्यात आली. सुरक्षा दलाने दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला वेढा दिला. दरम्यान, दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दल आणि जम्मू पोलिसांना यश आले.