ऑनलाईन टीम / कोल्हापूर
दिपाली भोसले सय्यद कुस्तीगीर फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा कोल्हापुरात पार पडला. हे उद्घाटन सिने अभिनेत्री दिपाली भोसले यांच्याहस्ते पार पडले. या फाउंडेशनचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील कुस्तीगिरांची शासन दरबारी प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे असे आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि प्रामुख्याने कुस्ती खेळा दरम्यान जखमी होणाऱ्या पैलवानांना दुखापत होते. किंवा यात ते कायमचे जखमी होण्यासारख्या दुर्दैवी घटना घडतात. पैलवान मृत्युमुखी देखील पडतात. यासाठी पैलवानांना विमा योजना असणे आवश्यक आहे.
अद्याप याची शासन दरबारी आवश्यक त्या प्रमाणात दाद घेतली जात नाही. यासाठी भरीव कामाची गरज असुन ती या फाउंडेशन मार्फत भरुन निघणार आहे. तसेच हिंदकेसरी झालेल्या पैलवानांनच्या पत्नी यांना सरकारतर्फे चालू असलेली तुटपुंजी पेन्शन वाढवने आवश्यक बनले आहे. तसेच महाराष्ट्रातील महिला कुस्तीगिरांसाठी महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धा चालू करणे व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पुरस्कार देणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सिनेअभिनेत्री शिवसेनेच्या दिपाली भोसले सय्यद तर संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष पैलवान योगेश पाटील कुर्डूकर तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अजित सर संस्थेचे सेक्रेटरी प्रसाद मोरे सर आहेत.