सध्या सर्वत्र ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची चर्चा आहे. तो इतका घातक नसला आणि त्यामुळे मृत्यू होत नसले तरी त्याच्या संसर्गाची क्षमता तिप्पट आहे. त्यामुळेच बाधितांची संख्या सध्या झपाटय़ाने वाढत आहे.
ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांनी नेमके यावरच बोट ठेवणारा एक तिरकस व्हिडिओ ट्वीटचा भारतीय अवतार असलेल्या ‘कू’ ऍपवर प्रसारित केला. प्रसारित होताच अक्षरशः लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि तेवढय़ाच वेगाने तो व्हायरलही झाला. ओमिक्रॉन फुफ्फुसावर आक्रमण करीत नाही. तर घशाला बाधित करतो. अनुपम खेर यांनी आपल्या व्हिडीओतून ही बाब तिरकसपणे सांगितली आहे. यासाठी त्यांनी एका गाण्याची पॅरोडी केली आहे –
‘जरासी खरखराहट होती है,
तो दिल सोचता है,
कही ये वो तो नही,
कही ये वो तो नही’
या ओळीतून साधे खाकरले तरी घाबरल्यासारखे होते अशी मजेदार भावना त्यांनी व्यक्त केली आहे.