ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह उद्या (दि. 7) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच काळानंतर ते राजकारणात सक्रिय होणार आहेत. उद्या दुपारी 12 वाजता भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे.
कृपाशंकर सिंह हे गेल्या बऱ्याच काळापासून पक्षीय राजकारणापासून दूर होते. ते ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने महापालिकेतील सर्व समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याला पक्षाने विरोध केल्याचे निमित्त साधून 2019 मध्ये काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता.