प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपत आली आहे. याच दरम्यान संरक्षण खात्याने कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या मानधनाची घोषणा केली आहे. कॅन्टोन्मेंट उपाध्यक्षांना दरमहा 8 हजार रुपये आणि सदस्यांना 6 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. तर 1 हजार रुपये पेट्रोल खर्च आणि फोन बील देखील देण्याची तरतूद कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सुधारित कायद्यानुसार करण्यात आली आहे. मात्र याची अंमलबजावणी दोन महिन्यांनंतर होणार असून नव्या सभागृहातील सदस्यांना याचा लाभ होण्याची शक्मयता आहे.
कायद्यात 2006 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. सुधारित कायद्याच्या आधारे लोकनियुक्त सदस्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. देशात 62 कॅन्टोन्मेंट असून चार भागात विभागणी करण्यात आली आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंटची विभागणी दुसऱया वर्गात करण्यात आली आहे. पहिल्या वर्गातील उपाध्यक्ष 10 हजार रुपये, दुसऱया वर्गातील उपाध्यक्ष 8 हजार रुपये, तिसऱया वर्गातील 6 हजार रुपये व चौथ्या वर्गातील उपाध्यक्षांना 4 हजार रुपये मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच सदस्यांना देखील मानधन मिळणार असून इतर खर्च आणि पेट्रोल खर्च देखील देण्यात येणार आहे. यापूर्वी प्राथमिक अधिसूचना जारी करून हरकती मागविल्या होत्या. दि. 27 जानेवारी रोजी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दोन महिन्यात या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पण फेब्रुवारी महिन्यात लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपणार आहे. जर लोकनियुक्त सभागृहाला मुदत वाढ मिळाल्यास वाढीव मानधनाचे पहिले मानकरी सध्याचे सदस्य ठरू शकतात. मुदतवाढ मिळाली नसल्यास नव्या सभागृहातील सदस्यांना वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे.